प्रज्ञा ठाकूर विरोधात मानवी साखळी द्वारे निषेध : विविध संघटनांचा सहभाग

जळगाव शहरातील विविध सामाजिक व महिला मंडळातर्फे प्रज्ञा ठाकूर हिचा निषेध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक कोर्टाजवळ संध्याकाळी मानवी साखळी करून प्रज्ञा ठाकूर चा निषेध करण्यात आला, यात प्रामुख्याने प्रज्ञा ठाकूर मुर्दाबाद ,धार्मिक आतंकवाद मुर्दाबाद, शहीद हेमंत करकरे अमर रहे, नही चलेगा नही चलेगा आंतकवाद नही चलेगा ,देश मे रहना है तो संविधान को बचाना है, अशा विविध घोषणांनी ह्या मानवी साखळीने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले.

लोकशाहीवादी संघटना ने याचे आयोजन केले होते त्यात जळगाव जिल्हा महिला असोसिएशन, जळगाव जिल्हा मानियार बिरादरी, जननायक फाउंडेशन, अंधश्रद्धा निर्मूलन समिति, मुस्लिम कब्रस्तान ट्रस्ट,मर्कज क्रिकेट क्लब,एम पी जे,कुल जमाती संघटना सह जळगाव शहरातील इतर संघटनांनी सहभाग नोंदविला होता.

यात प्रत्येकाच्या हातात बॅनर होते त्यात शाहिद हेमंत करकरे चे छाया चित्र,प्रज्ञा ठाकूर आतंकवादी म्हणून छायाचित्रे, हाती होती.

या मानवी साखळीत प्रामुख्याने वासंती दिघे, राजकुमारी बालदी, ज्योस्तना मराठे, अंजली पाटील, प्रतिभा शिरसाट, योगिता सपकाळे, प्रतिभा सुर्वे, गायत्री सोनवणे ,वैशाली पाटील, पूजा पाटील, भारती पाथरकर ,फारुक शेख, सलमान पठाण, वसीम शेख सागर साळुंके, प्राध्यापक डॉक्टर आशिष जाधव, प्राध्यापक शेखर सोनाळकर, अंजूम रिझवी, सय्यद दानिश, ताहेर शेख ,कॉम्रेड सुर्वे,आरिफ देशमुख, तन्वीर शेख, गणेश पाटील, गनी शेख,अख्तर शेख, नाजिम शेख ,अश्फाक पिंजारी, फिरोज पिंजारी, हारून पिंजारी, सलीम मनियार आदींचा सहभाग होता.

फोटो-मानवी साखळी करून प्रज्ञा ठाकूर चा निषेध करतांना वासंती दिघे,राजकुमारी बालदि,वैशाली पाटील, आदी दिसत आहे

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading