नांदेड:भाजपा महानगर नांदेडच्या वतीने उत्तर नांदेड व दक्षिण नांदेड या दोन्ही विधानसभेत वेग वेगळ्या विजय संकल्प मोटारसायकल रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.उत्तर विधानसभेतील रॅली ची सुरुवात श्री राजर्षी शाहू महाराज पुतळा,गणेशनगर,नांदेड येथून होणार आहे तर दक्षिण विधासभेतील रॅली ची सुरुवात कलामंदिर येथून होणार आहे. दोन्ही रॅली ला सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे .या रॅली शहरात फिरून नंतर ग्रामीण भागात जाणार असून त्यांचा समारोप दुपारी सहयोग कॅम्पस, विष्णुपुरी,नांदेड येथे होणार आहे.देश भक्ती पर गीत वाजवणारा रथ या रॅली च्या अग्रभागी राहणार आहे.या रॅलीत सर्व बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत,अशी माहिती भाजपा महानगर नांदेडचे जिल्हाध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे यांनी दिली.