नांदेड दि. 19 :- प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, मावा आदी तत्सम पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत नुकतेच उमरी येथे न्यायालयात दाखल खटल्यातील 3 लाख 63 हजार 560 रुपयाचा प्रतिबंधित साठा जाळून नष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीविरुद्ध न्यायालयात खटला दाखल असून गुन्हा सिद्ध झाल्यास 6 वर्षापर्यंत कारावास व 5 लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत आहे.
