किनवट:गावाच्या मध्यभागी असलेल्या घरात अस्वल घुसला

वनविभागाला जिवंत अस्वलला पकडण्यात आले यश

मांडवी ता. किनवट( प्रतिनिधी ) मांडवी पासून जवळच असलेल्या पळशी गावाच्या मध्यभागी असलेल्या घरात आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास एक जंगली अस्वल घुसल्याने एकच खळ्बळ उडाली वनविभागाने मांडवी पोलीसांच्या साह्याने त्या अस्वलला जिवंत पिंजऱ्यात केले जेरबंद.आज दिनांक २२ जानेवारी रोजी पळशी येथील श्रीनिवास अड्डीवार यांचे गावाच्या मध्यभागी असलेल्या घरात आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास एक जखमी असलेला अस्वल घुसले अस्वल घरात घुसल्याने गावात भितीचे वातावरण पसरले होतेया घटनेची माहिती मिळताच सा वनसंरक्षक अधिकारी राजेंद्र नाळे,वनपरीक्षेत्रीय अधिकारी तायनाक यानी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले वर्गइस जि प सदस्य मधुकर राठोड हे सुद्धा हजर होते त्यांना जखमी अवस्थेत अस्वल घरात लपलेला आढलुन आले वनविभाग व मांडवी  पोलीसांनी रिक्सीव ऑपरेशन राबवुन जखमी असलेल्या अस्वलला पिंजऱ्यात जेरबंद करून राजगड येथील कॅंपवर नेउन त्यावर पशुवैद्यकीय उपचार करण्यात येत आहे अस्वल जखमी होण्याचे कारण विचरले असता दोन अस्वलात भांडण होवून जखमी झाले असल्याचे अंदाज वनविभाकडुन वर्तविण्यात आले.हे रिक्सिव ऑपरेशन सावनसंरक्षक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनवनपरिक्षेत्रीय अधिकारी तायनाक व मांडवी पोलीस ठाण्या स प नि संतोष केंद्र यसस्वी राबविले व वनविभागाचे वनपाल एम बि राठोड,वनपाल शेख काजी,फिरते पथकाचे राहुल शेळके,ए बि राठोड,सरनगावकर,संतवणे,फरिद समेठी,वनरक्षक आर बि जाधव,घमे,आवळे ,कपिल भगत व पोलिस ठाण्याचे ए एस आइ कोळी ,चव्हाण,जनजवळे आदींचा सहभाग होता

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading