औरंगाबादेतून खैरेंविरोधात काँग्रेसकडून हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद – लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जोर आला आहे. औरंगाबादमधून काँग्रेसकडून आता कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव चंद्रकांत खैरे याच्याविरुद्ध शड्डू ठोकण्याची शक्यता आहे. याआधी सुभाष झांबड यांचे नाव काँग्रेसकडून चर्चेत होते. परंतु आता हर्षवर्धन जाधव यांचे नाव पुढे आल्याचे समजते.मराठा आरक्षणावरून शिवसेनेला धारेवर धरणारे हर्षवर्धन यांनी आधीच औरंगाबादेतून लोकसभा लढविण्यासाठी दंड थोटपटले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘शिवस्वराज्य बहुजन पक्ष’ स्थापन करून लोकसभा लढविणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच ३० मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे म्हटले होते. परंतु काँग्रेसकडून त्यांचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मराठा मोर्चांच्या वेळी हर्षवर्धन यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली होती. त्यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्यास आपल्यावर शिवसेना नेत्यांकडून प्रतिबंध लावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ते राज्य पातळीवर चर्चेत आले होते.

 

 

हर्षवर्धन यांच्यासह सुभाष झांबड आणि सतीष चव्हाण यांचे देखील नाव केंद्रीय समितीकडे पाठवले होते, असं काँग्रेस नेते अब्दुल सत्तार यांनी आधीच सांगितले आहे. परंतु आता हर्षवर्धन यांचे नाव आघाडीवर आहे.

२००९ मध्ये हर्षवर्धन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच कन्नड विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून विजय मिळवला होता. मात्र आरक्षणाच्या मुद्दानंतर आमदारकीचा राजीनामा दिला होता.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading