अर्धापूर दि.( शेख जुबेर.) जम्मूकश्मीर मधील पुलवामा येथे भारतीय सैनिकांवरती अतिरेक्यांनी काल भ्याड हल्ला केला.त्या दहशतवादी हल्यात 42 जवान शहीद झाले. त्या हल्याच्या निषेर्धात शुक्रवारी (ता.15) शहरातील हिंन्दुतवादी संघटना व युवकांच्या वतिने निषेध रँली काडून अश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिण्यात आली.भारत माता की जय,वंदे मातरम् ,बदला घ्या,अतिरेकी पाकड्यांना धडा शिकवा च्या घोषना देत शहरातील प्रमुख मार्गावरून निषेध रँली काढण्यात आली.बसस्थानक परिसरात पाकिस्थानचा झेंडा जाळण्यात आला.शहरातील हनुमान मंदिर चौक येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी शहीद जवानांना अश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शहीदांचे बलिदान यर्थ जाणार नाही,पाकिस्थानला जशास तसे उत्तर द्यावे अश्या शोक भावना अनेकांनी व्यक्त केल्या.यावेळी कृष्णा देशमुख,बाबुराव लंगडे,प्रमोद मुळे, गुणवंत विरकर,सखाराम क्षिरसागर,योगेश हाळदे,सदाशिव दुधाटे,तुकाराम साखरे,विशाल चिंचोलकर,सोनू परडे,तुकाराम माटे,विलास साबळे,शैलेश लोमटे,गोविंद लंगडे,ज्ञानेश्वर माटे,रमाकांत राऊत,साईनाथ येवले,युवराज विरकर,राजकिरण साखरे,ऋतुराज देशमुख,हनुमान फाटेकर,मन्मथ खुरगांवकर,साईनाथ लंगडे,शिवप्रसाद कापसे,अभि कापसे,प्रसाद बुटले,शुभम इंगळे,विशाल देशमाने,राजेश पवार,शुभम गुरूबनवार यांच्यासह शेकडो युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते