
किनवट:28 oct.(प्रतिनिधी )१.लाख रुपये हुंड्याची मागणी करून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचा मनीषा सज्जन लिंगावर हिने पोलीस ठाणे मांडवी ता किनवट येथे तक्रार दिली त्यावरून पोलिसानी आरोपी पती सज्जन पी विठ्ठल लिंगान्वर. सासरा विठ्ठल लिंगांवर सासू चंद्रकला लिंगांवर सर्व रा पांगडी ता घाटंजी जी येवतमाळ यांचे विरुद्ध भा द वि चे कलम ४९८(अ) ३२३ ५०४ ५०६ ३४ प्रमाणे गुन्हा क्र ६/२०१६नोंद करून किनवट न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले .सरकार पक्ष तर्फे न्यायालयात एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले न्यायालयाने अभिलेखावर आलेला पुरावा व दोन्ही पक्षाचे युक्तिवाद एकूण न्यायधीश जे एन जाधव यांनी सर्व आरोपीची वरील सर्व गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आरोपी तर्फे येथील युवा विधिज्ञ तौफिक कुरेशी यांनी काम पाहिले