मुंबई – पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे होरपळत असलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून काल पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पाच रुपयांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता डिझेलच्या दरात आणखी चार रुपयांनी कपात करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत.इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्न करीत असून आज डिझेल 4 रुपयांनी स्वस्त करण्याबाबत अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी आज नाशिक येथे वार्ताहरांशी बोलताना दिली. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या दीक्षांत कार्यक्रमानंतर ते बोलत होते केंद्र आणि राज्य सरकारने कर कमी केल्याने काल पेट्रोलचे दर 5 रुपयांनी कमी करण्यात आले. आज डिझेल संदर्भातील निर्णयांची अंमलबजावणी होईल असे ते म्हणाले.