युतीचा फॉर्म्युला बदलला; भाजपाच ‘मोठा भाऊ’ ठरला

मुंबई- लोकसभा निवडणूक 2019च्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आघाडीचं जागावाटप ठरलं असतानाच शिवसेनाभाजपा युतीहोण्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. लोकसभेच्या भाजपा25 जागा लढणार असून, शिवसेना 23 जागा लढण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रत्येकी 144 जागा लढवणार असल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपा पालघरची जागाही शिवसेनेला देण्यास तयार झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्यावर शिवसेना आणि भाजपात एकमत झाले असून, सोमवारी भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्याची घोषणा करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना उद्धव ठाकरे यांनी ‘यापुढे भाजपाशी युती करणार नाही,’ अशी घोषणा केली होती. त्यानंतरही लोकसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढावी, असा भाजपाचा आग्रह होता, तर लोकसभेचे जागावाटप जाहीर करतानाच विधानसभा निवडणुकीचेही जागावाटप जाहीर करण्याचा शिवसेनेचा आग्रह होता. तो भाजपाने मान्य केला असून, सध्याच्या चर्चेनुसार लोकसभेसाठी भाजपा 25 जागा लढणार असून, शिवसेना 23 जागा लढवणार आहे.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading