मंदिर वही बनायेंगे! – देवेंद्र फडणवीस

मुंबई :राममंदिराची लढाई ही केवळ सात वर्षांची नाही. सातशे वर्षांपासूनची आहे. यात धु्रवीकरण आणि राजकारण कुणीही घुसवू नये. राम मंदिराबाबत जर चर्चा होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही. प्रभू श्रीरामाने आम्हाला मर्यादा शिकवली. महात्मा गांधीही रामराज्य यावे असे सांगत होते. आम्ही कायद्याने चालणारे लोक आहोत त्यामुळे न्यायपालिकेचा सन्मान करू. राममंदिर हा कोट्यवधी जनतेच्या आस्थेचा प्रश्न आहे. या देशातील मानबिंदू आणि संस्कृती मिटविण्यासाठी राममंदिर तोडले गेले. आता प्रश्न हा नाही की, मंदिर केव्हा होईल? मंदिर जागेवर आहेच. भव्य मंदिर केव्हा होईल मुद्दा उरला आहे. मंदिर उभारले जावे यासाठी आमचे प्रयत्न असतीलच मात्र कुणी जर मस्जिद तोडत असेल तर त्याला माझा विरोध असेल. मस्जिदीच्या बाजूने मी उभा राहील अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.मंदिराबाबत संसदेत कायदा व्हावा असे वाटते का? असा प्रश्न विचारता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यसभेत भाजपचे संख्याबळ नाही. राहुल गांधी अलीकडे मंदिरात जात असतात. त्यांनी जर राममंदिरास पाठिंबा दिला तर राज्यसभेत हा कायदा सहज मंजूर होऊ शकतो

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading