बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान एक दिवसीय सामन्यावर सट्टा लावल्या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला अटक

मुंबई. आशिया कप ट्राॅफीतील बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान एक दिवसीय सामन्यावर सट्टा लावल्या प्रकरणी ठाण्याच्या भाजप पदाधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. विकास दाभाडे असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे.एक दिवसीय सामन्यावर दाभाडे काही लोकांसोबत सट्टा लावत होता. पालघर गुन्हे शाखेला याची माहिती मिळताच त्यांनी याठिकाणावर धाड घातली.त्याठिकाणाहून 10 जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणी न्यायालयाने दाभाडेला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान, याप्रकरणात दाभाडेसोबत आणखी कोण सहभागी होते याचा तपास पोलीस घेत आहेत.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading