पुसद:जन्म मृत्यू नोंद विभागाच्या कामात सुधार करण्याचे लेखी आश्वासन नगरसेवक साकीब शाह यांच्या उपोषणाची फलश्रुती

पुसद-नगर परिषदेच्या  जन्ममृत्यू नोंद विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात काँग्रेस नगरसेवक साकीब शाह यांच्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी नप ने त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करून  कामकाज सुधारण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे  सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी केलेल्या  उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मिळालेली फलश्रुती होय.
काँग्रेस नगरसेवक साकीब शाह यांनी  जन्म मृत्यू नोंद विभागाचे  संगणकिकरण,  करावे ,  पुसद येथे झालेल्या प्रत्येक जन्म मृत्यू नोंदची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचेकडे पाठविली जाते. त्यांचेकडून जीर्ण अथवा फाटलेल्या रेकॉर्ड ची माहिती मागविण्यात यावी,,मुस्लिम नागरिकांच्या  अवघड नावातील चुका टाळण्यासाठी या विभागात एका मुस्लिम कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी  या व अश्या महत्वाच्या मागण्यांसाठी आज पासून देखील शाह यांनी  उपोषण सुरु केले होते. या उपोषणाची दखल घेत नप उपाध्यक्ष डॉ अकिल मेमन व मुख्यधिकारी निर्मला राशीनकर यमगर यांनी जन्म मृत्यू नोंद संगणकीकरण करणे,जीर्ण नोंदी यवतमाळ व पुणे येथून लवकरच उपलब्ध करून देण्याचे,
न्यायालयीन  प्रक्रियेसाठी विशिष्ठ वकिलांसोबत मिळून मिळून  भ्रष्टाचार करणाऱ्याची  १ महिन्यात चौकशी करण्याचे,गहाळ नोंद ची मुळ प्रत असल्यास त्यावरून प्रमाणपत्र देण्यावर विचार करणार, तसेच मुस्लिम  लिपिकाची  या विभागात नियुक्ती करणार या मागण्या लेखी मान्य करण्यात आल्या.त्यामुळे साकीब शाह यांनी आपले उपोषण मागे घेतले. त्यांच्या उपोषणाला भीमटायगर सेना,जमाते उलेमा हिंद, समाजवादी पार्टी,वंचीत बहुजन आघाडी,बिरसा मुंडा क्रांती दल,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा यांनी पाठिंबा दिला होता तर अनेक जागृक नागरिकांनी उपोषणस्थळी आपला अभिप्राय नोंदविला. जन्म मृत्यू नोंद विभागातील उपलब्ध नसलेल्या रेकॉर्ड मुळे नागरिकांना न्यायालयीन प्रक्रियेसाठी विशिष्ठ वकिलांसोबत मिळून नागरिकांना खर्चात पाडून भ्रष्टाचार करणाऱ्यावर  १ महिन्यात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
पोटात बॉक्स
संगणकीकरणाचा ठराव २०१७ चाच
 जन्म मृत्यू नोंद विभागाच्या संगणकीकरणाचा ठराव २०१७ साली होऊन कामही सुरू झाले होते.मात्र संबंधित कंत्राटदारासोबत वाद झाल्याने हे काम प्रलंबित झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.याबाबत मुख्याधिकारी निर्मला राशीनकार  यांची प्रतिक्रिया घेतली असता   या अत्यंत महत्वाच्या कामाबद्दल गांभीर्याने लक्ष देऊन जुन्या ठरवावरच निविदा प्रक्रिया राबविणार असल्याचे  त्यांनी देशोन्नतीला सांगितले.दरम्यान न्यायालयीन प्रक्रियेमुळे आर्थिक भुर्दंड सोसलेल्या नागरिकांच्या खर्चाला मालमत्ता करातून भरपाई देण्याबाबत कायद्यात तरतूद नसल्याचे सांगण्यात
पोटात बॉक्स
भाजप मुग गिळून गप्प
सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक ,मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्या जन्म मृत्यू नोंद विभागाच्या भोंगळ कारभारावर काँग्रेस च्या एकट्या नगरसेवकाने पहिल्याच दिवशी मागण्या मान्य करून घेतल्या. मात्र १०सदस्य असलेला विरोधी पक्ष भाजप मुग गिळून चूप बसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.तर काँग्रेस ने देखील सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आपल्या नगरसेवकाला पाठिंबा देण्याची नैतिकता दाखविली नाही याला काय म्हणावे?

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading