पुणे पोलीस मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करत आहे: सचिन सावंत

मुंबई दि. १९ नोव्हेंबर २०१८

भीमा कोरेगाव दंगलीशी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा संबंध जोडून काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचा पुणे पोलिसांनी चालवलेला प्रयत्न मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठीच आहे. असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की,पुणे पोलिसांची विश्वासार्हता पूर्णपणे संपलेली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव दंगलीच्या संदर्भात सुनावणी करताना पुणे पोलीस सातत्याने माध्यमांसमोर का जात आहेत?असा प्रश्न विचारत पुणे पोलिसांचा समाचार घेतला होता. असे असतानाही पुणे पोलिसांचे अधिकारी माध्यमांशी जाणिवपूर्वक संवाद साधत आहेत. त्यांचा या मागचा हेतू हा पूर्णपणे भारतीय जनता पक्षाला मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत मदत व्हावी हाच आहे असे दिसून येते आहे. पुणे पोलीस सरकारच्या इशा-यावर चालणारे प्यादे बनले आहेत.
,पुणे पोलिसांची विश्वासार्हता पूर्णपणे संपलेली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव दंगलीच्या संदर्भात सुनावणी करताना पुणे पोलीस सातत्याने माध्यमांसमोर का जात आहेत?असा प्रश्न विचारत पुणे पोलिसांचा समाचार घेतला होता. असे असतानाही पुणे पोलिसांचे अधिकारी माध्यमांशी जाणिवपूर्वक संवाद साधत आहेत. त्यांचा या मागचा हेतू हा पूर्णपणे भारतीय जनता पक्षाला मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत मदत व्हावी हाच आहे असे दिसून येते आहे. पुणे पोलीस सरकारच्या इशा-यावर चालणारे प्यादे बनले आहेत.
एके ठिकाणी जिवंत बॉम्बचा साठा सापडल्या प्रकरणी सनातन संस्था आणि शिवप्रतिष्ठानच्या लोकांना साधे चौकशीसाठी बोलावले जात नाही. तसेच भीमा कोरेगाव दंगलीचे मुख्य सुत्रधार मिलिंद एकबोटे व संभाजी यांची साधी चौकशी न करता एल्गार परिषदेचा या दंगलीशी संबंध जोडून त्याची चौकशी केली जात आहे. शहरी नक्षलवाद हा शब्द राजकीय फायद्यासाठी वापरून कट्टरतावाद्यांपासून दुसरीकडे लोकांचे लक्ष वळावे हा सरकार व भाजपचा प्रयत्न आहे. पुणे पोलीस यात त्यांना मदत करत आहेत. महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा गुजरात मॉडेलनुसार चालवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे पण गुजरात मॉडेलची कशी वाताहत झाली हे जनतेसमोर आहे. महाराष्ट्र पोलिसांची तशी अवस्था होऊ नये अशी चिंता सावंत यांनी व्यक्त केली.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading