परभणी : समाजवादी पार्टीच्या जिल्हा पदाधिकाºयांच्या बैठकीचे आयोजन

परभणी  : प्रतिनिधी . आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष आ.अबु आझमी यांच्या आदेशाने समाजवादी पार्टीच्या जिल्हा पदाधिकाºयांची बैठक दि.२९ डिसेंबर रोजी दुपारी २.०० वा. वसमत रोडवरील सावली विश्रामगृह येथे ठेवण्यात आली.जिल्हयातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की,पार्टीच्या प्रदेश महासचिवपदी नुकतीच निवड झालेले मोहम्मद अल्ताफ यांच्या सुचनेप्रमाणे आगामी निवडणूका डोळ्या समोर ठेवून जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत प्रदेश सचिव मुंबई जुल्फेखार आझमी,प्रदेश सचिव मो.अल्ताफ आदीं उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह््यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यानी सावली विश्राम गृहात वेळेव उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष मंसुर खान ,जिल्हा महासचीव मोईन खान, शमशोद्दीन अन्सारी,खाजा मुजमील, सुधाकर पौळ, रामदास आवचार आदीनी केले आहे.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading