नांदेड/प्रतिनिधी-राज्य शासनाने पारीत केलेल्या शासकीय जाहीरात धोरण 2019 संदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील लघु दैनिकांच्या संपादकांची महत्वपूर्ण बैठक बुधवार दि.26 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता सायं दै.नांदेड वार्ता कार्यालय, कॉ.व्ही.डी.देशपांडे भवन,सोमेश कम्पाऊंड मिल गेट जवळ नांदेड येथे आयोजित केली आहे. राज्य शासनाने नवीन धोरणात दैनिकांसाठी 7600 चौ.से.मी.ची जाचक अट घातली असून या संदर्भात सविस्तर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी बुधवार दि.26 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता मिलगेट जवळील सायं दै.नांदेड वार्ता कार्यालय, कॉ.व्ही.डी.देशपांडे भवन, लालबावटा कार्यालय येथे आयोजित केली आहे. सर्व लघु वृत्तपत्राच्या दैनिकांच्या संपादकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी आ.गंगाधर पटणे, प्रदीप नागापूरकर, अ.सत्तार अ.रऊफ, रुपेश पाडमुख, सौ.अनुराधा विष्णूपुरीकर, अविनाश पाटील, भानुदासराव देशपांडे, राजेश पटणे, विलास महाजन, राजेश पटणे, सतीश सोनवणे, राजु भोकर, मो.युसूफ, धम्मपाल नरवाडे यांनी केले आहे.