परभणी : प्रतिनिधी :शहरातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाºया माजी नगरसेवक हाजी सलीम कच्छी यांची घांची समाजाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी सचिव अली सोळंकी ,उपाध्यक्ष हाजी हबीब वाली बोगा यांच्याही निवडी करण्यात आल्या. यावेळी हाजी इक्बाल, हाजी हनीफ,हाजी इरफान, हाजी ईलयास , इक्राम मोहमद्द , हाजी युनूस , साजिद बशीर,हाजी शरीफ, हाजी कादर ,नदीम जमाल ,अबूबकर,अल्ताफ भाई,हाजी उमर,अब्दुल रौफ आदींची ही निवड करण्यात आली. सलीम कच्ची हे माजी आमदार बोबडे पाटील यांचे पी.ए. होते तसेच ते शहरातील एकबाल नगर येथील नगरसेवकही होते त्यांना समाजासाठी अहोरात्र कार्य केलेले आहे. सर्वसामान्यांमध्ये वर्चस्व असून अनुभवी नगरसेवक आहे याचा लाभ त्यांचा घांची समाजाला नक्कीच होईल अशी अपेक्षा समाजातील नागरीकांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. या निवडीबद्दल नगरसेवक रवी सोनकांबळे , निसार खान, जावेद पाशा,गफ्फार शेख , शेख मुन्ना आदींनी शुभेच्छा दिल्या.