परभणीत अभियंत्या युनूस खानला ८ हजार रुपयांची लाच घेताना अटक

परभणी – येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागीय कार्यालयात शनिवारी एका उप कार्यकारी अभियंत्याला कनिष्ठ अभियंत्याकडून ८ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.युनूस खान इब्राहिम खान (वय ५४) असे या उप कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. त्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिंतूर ग्रामीण पाणी पुरवठा उप विभागात कार्यरत तक्रारदार तथा कनिष्ठ अभियंता ५० दिवस मेडिकल रजेवर होते. विशेष म्हणजे त्यांची रजा शिल्लक होती. त्यानुसार त्यांनी उपविभागीय कार्यालयकडे रजा परावर्तित करण्याकरीता अर्ज केला होता. परंतु सदरची ५० दिवस रजा मंजूर करण्यासाठी पडताळणी दरम्यान उप कार्यकारी अभियंता युनूस खान याने १० हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र, तडजोडीअंती ८ हजार देण्याचे ठरले.हीच रक्कम घेताना युनूस खान याला शनिवारी त्याच्याच कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी नव मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपअधीक्षक रवींद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेकानंद भारती, अनिल गव्हाणकर व त्यांच्या पथकाने बजावली.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading