नांदेड: मराठवाडाश्री शरिरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन

नांदेड,दि.25- प्रजासत्ताक दिन आणि कालवश श्याम सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मंगळवारी (दि.26) सायंकाळी 4.00 वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे मराठवाडाश्री शरिरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कबीर क्रीडा मंडळ, महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशन, इंडियन बॉडिबिल्डींग फेडरेशन यांच्यावतीने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.मराठवाडाश्री या स्पर्धेचे उदघाटन अशोकराव चव्हाण यांच्याहस्ते होणार आहे. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. अमर राजूरकर आणि स्वागताध्यक्ष आ. डी.पी. सावंत राहणार हे उपस्थित राहणार आलेत. साहेबराव सोनकांबळे यांनी ही स्पर्धा आयोजित केली असून स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे. टायटल विजेत्यास 21 हजार रूपये, बेस्ट पोझर 3100, बेस्ट एक्युमेंट 3100 अशी रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर पहिले 1500, दुसरे 1000, तिसरे 700 व चौथे 500 याप्रमाणे गटातील बक्षीसांची विभागणी केली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून यासाठी 100 रूपये याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. 0 ते 55, 56 ते 60, 61 ते 65, 71 ते 75 आणि त्यावरिल वजनगटात असणारे स्पर्धक पात्र राहतील.पंचकमिटीत औरंगाबाद येथील मोहसीन निजाम खान, इब्राहीम चाऊस, आवेस सिद्धीकी, अब्दुल्ला शेख, रिझवान, परभणी, सुशील सावंत, नांदेड, अकबर फौजी, जालना, अझर हुसेन, दीपक ठाकूर, संदिप पाटील मगर यांचा समावेश आहे. संयोजन समितीत राजू कपाळे, सिद्धार्थ गच्चे, राजू जोंधळे, अनिल गाजुला, सचिन कांबळे, प्रविण शेळके, सोनु गजभारे आदींसह गब्बर सोनवणे मित्रमंडळाचा समावेश आहे. शहरातील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक साहेबराव सोनकांबळे यांनी केले आहे

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading