नांदेड:ख्रिस्तमस निमित्त विजयवाडा – नगरसूल – विजयवाडा हि विशेष गाडी चालविण्याचे ५ठरविण्यात आले आहे. गाडी संख्या ०७७१३ हि विजयवाडा येथून दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी ०९.३० वाजता सुटेल आणि सिकंदराबाद मार्गे नगरसूल येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०७७१४ दिनांक २५ डिसेंबर रोजी १७.३० वाजता नगरसूल येथून सुटेल . हि गाडी औरंगाबाद , जालना, परभणी, पुर्णा , नांदेड, निझामाबाद, सिकंदराबाद, येथे थांबेल.