किनवट:मुस्लिम युवकाने विद्युतखांबावर गळफास घेऊन जीवन संपविले

किनवट, दि.18 (प्रतिनिधी) : शहरातील सुभाषनगर परिसरात राहणार्‍या एका मुस्लिम युवकाने दारूच्या नशेत शनिवारी रात्री दीडच्या सुमारास रस्त्यावरील विजेच्या खांबावर गळफास घेऊन आपले जीवन संपविले.पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सुभाषनगर येथील रहिवासी शेख सलीम शेख हसन (वय 32 वर्षे) या तरुणाने शनिवारी (दि.18) रात्री 1.30 सुमारास मद्यधुंद अवस्थेत सुभाषनगर ते गोकुंदा येथील बाळासाहेब ठाकरे चौकाकडे जाणार्‍या मार्गावरील एका विद्युतखांबावर चढून गळफास घेऊन आत्महत्या केली. IMG-20190518-WA0039सदर युवकास काही कठीण समस्या होती वा तो कुठल्या चिंतेत किंवा अडचणीत होता; की ज्यामुळे त्यास आत्महत्येसारखा मार्ग पत्करावा लागला, याविषयी काही माहिती मिळाली नाही. पोलिसांची चौकशी चालू आहे. मयताचे काका इस्माईलखान समशेरखान (वय 59 वर्षे, व्यवसाय व्यापार, रा.हबीब कॉलनी) यांनी दिलेल्या खबरेवरून किनवट पो.स्टे.मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading