औरंगाबाद | शिवसेनचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याबद्दल लवकरच गुड न्यूज मिळेल, असा गौप्यस्फाेट काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार यांच्यात औरंगाबाद मध्ये गोपनिय बैठक झाली आहे.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आनंद होईल, असं देखील अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
दरम्यान, अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार यांच्या भेटीमुळं भाजपचे जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.