अयोध्येत बंदुका हातात घेऊन शिवसैनिकांच्या राममंदिरासाठी घोषणा!

अयोध्या | अयोध्येत वातावरण तापण्याची शक्यता आहे. कडेकोट बंदोबस्त असतानाही शिवसैनिक हातात बंदुका घेऊन घोषणा देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.राम मंदिर उभारावं या मागणीसाठी हजारो शिवसैनिक अयोध्येला गेले आहेत. त्यामुळे योगी सरकारने मोठा फौजफाटा तैनात केला आहे.मात्र अयोध्येत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही शिवसैनिक हातात बंदुका घेऊन राम मंदिराच्या घोषणा देत आहेत. त्यामुळे अयोध्येत सध्या भितीचं वातावरण तयार झाल्याचं समजतंय.दरम्यान, अयोध्येत हजारो कार्यकर्ते जमा झाल्यामुळे शेकडो मुस्लिम लोक घर सोडून गेले असल्याचेही माहिती मिळतेय.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading