अकोला – अकोला रेलवे आरपीपीएफचे पोलिस निरीक्षक विनोद लांजेवार यांचे मार्गदर्शनमध्ये स्टेशन परिसरात ड्राप एन्ड गो परिसर मध्ये अनाधिकृत रीत्या वाहने उभे करणारे वाहनधारकांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी केली व वाहन चालक यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगितले
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात आटो चालक यांनी मनमानी पद्धतीने वाहने उभी करून रेल्वे प्रवाशी मिळवितांना रस्त्यावर, रस्त्यांच्या मधोमध वाहने उभी केल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असते याबाबत अनेकदा आमदार ,खासदार व शहरातील विविध मान्यवरांनी रेल्वे स्थानक प्रशासनातील अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत तरीही रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी ची समस्या सुटल्या नाहीत त्यातच येत्या 28 तारखेला रेल्वे चे महाव्यस्थापक अकोल्यात येत असल्याने रेल्वे स्थानक प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून रेल्वे स्टेशन व परिसरात चकाकी आणली त्यात रेल्वे स्थानक परिसरात वाहन कोंडी महाव्यस्थापक यांना दिसू नये यासाठी रेल्वे पोलीस प्रयत्न करीत आहेत त्यांनी अनेकदा परिसरात वाहने उभी करणाऱ्याना तोंडी सांगितले तर प्रसंगी दंडात्मक कारवाई केली तरीही रेल्वे स्टेशन परिसरात वाहने उभी करणाऱ्यांवर काहीही फरक पडल्याचे दिसून येत नाही म्हणून आज रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी आपल्या दल मार्फत वाहने विस्कळीत पध्दतीने उभे करणाऱ्या वाहनधारकांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी करून वाहतूक चे नियम समजावून सांगितले त्यामुळे आतातरी यांच्यात काही सुधारणा होईल काय?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे किमान 28 डिसेंम्बर पर्यंत तरी वाहतूक कोंडी होऊ नये असे चित्र च रेल्वे महाव्यस्थापक यांना दिसावे अशी अपेक्षा रेल्वे पोलीस करीत आहेत.