Jitesh Antapurkar Resigns: निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार जितेश अंतापूरकर यांचा पक्षाचा राजीनामा

Jitesh Antapurkar Resigns: निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार जितेश अंतापूरकर यांचा पक्षाचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात

Jitesh Antapurkar Resigns Photo Credit X

Jitesh Antapurkar Resigns: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. जितेश अंतापूरकर लवकरच भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत या जागेवरून कोणाला तिकीट दिले जाणार आहे. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होंटिग केल्यामुळे जितेश अंतापूरकर यांच्यावर पक्षाकडून हल्लाबोल झाला होता. अशोक चव्हाण स्वत: एकेकाळी कॉंग्रेसमध्ये होते. (हेही वाचा- अशोक चव्हाण भाजप प्रवेश करण्याची शक्यता, काँग्रेस पक्ष आणि विधमंडळ सदस्यत्वाचा आजच राजीनामा देणार असल्याची चर्चा)

आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

कोण आहे जितेश अंतापूरकर ?

जितेश अंतापूरकर 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देगलूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजयी होऊन आमदार झाले. त्यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत काँग्रेस पक्षावर निष्ठा दाखवली आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी समर्पित राहिले. अंतापूरकर यांनी पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्यसेवा, समाजकल्याण या प्रश्नांकडे विशेष लक्ष दिले. त्यांच्या मतदारसंघातील लोकांशी असलेली जवळीक आणि संवाद कौशल्य हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading