नांदेड – मंगळवारी संध्याकाळी घरात अचानक लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू झाला. मनिषा कऱहाळे असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना अर्धापूर शहरातील फुलेनगर भागात घडली.
या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. पण, गॅस सिलेंडर लिक झाल्यामुळे आग लागल्याचे बोलले जात आहे. फुलेनगर येथे कऱ्हाळे कुटुंब राहते. मंगळवारी संध्याकाळी अचानक या घरात आग लागली. घरातील महिलेचा आरडाओरडा ऐकल्यावर परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या तासानंतर आग विझवण्यात यश आले. पण, तोपर्यंत महिला सत्तर टक्के भाजली होती. यात तिचा जागीच मृत्यू झाला