हिमायतनगर युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी येथील युवा कार्यकर्ता मिरझा मुन्वर बेग, यांची निवड करण्यात आली असल्याचे पात्र बुधवारी हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते देण्यात आले.
हि निवड माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खा.राजीव सातव यांच्या शिफारशीने करण्यात आल्याचे पत्रात म्हंटले आहे. यावेळी हादगाव – हिमायतनगर विधासनभा युवक काँगेसचे अध्यक्ष संदीप पाटील, हिमायतनगरचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, हिमायतनगरचे प्रथम नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान, माजी जी.प.सदस्य सुभाष राठोड, माजी सरपंच चांदभाई, गणेश शिंदे, ठेकेदार सुरेश पळशीकर, अश्रफ भाई, रफिक सेठ, शे.रहीम पटेल, माधवराव पाळजकर, प्रवीण कोमावार, संजय माने, शे.मुखीद खडीकर, गणेश पाटील देवराय, श्रीदत्त पाटील, गोविंद पाटील देवराय, आदींसह अनेकांची उपस्थिती होती