नांदेड – मिनीस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स ऍन्ड डेव्हलपमेंट, ऑल इंडिया कॉन्सील फॉर टेक्नीकल एज्युकेशन आणि परसिस्टंट सिस्टिमस् यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यभामा युनिव्हर्सिटी कांचीपुरम तामिळनाडू येथे स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2019 (सॉफ्टवेअर एडिशन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्यूटर डिपार्टमेंट मधील 6 विद्यार्थ्यांच्या अर्काना या संघाने सहभाग नोंदविला होता. देशपातळीवरील या स्पर्धेत एमजीएम च्या संघाला प्रथम पारितोषीक प्राप्त झाले आहे.
सत्यभामा युनिव्हर्सिटी कांचीपुरम या ठिकाणी देशपातळीवरील सॉफ्टवेअर एडिशन स्पर्धा दि.2 ते 3 मार्च या कालावधीमध्ये पार पडल्या. त्या स्पर्धेत एमजीएम महाविद्यालय नांदेड येथील 6 विद्यार्थ्यांच्या संघाने समावेश घेतला होता. त्यातील अर्काना संघाची निवड शेवटच्या फेरीमध्ये झाली होती. या विद्यार्थ्यांनी लेबर ऍन्ड एम्प्लॉयमेंट या मिनीस्ट्रीच्या एका समस्येवर सोल्युशन सुचविले. दैनंदिन जिवनात कामगारांना येणार्या अडचणी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सोेडवून दाखविल्या. सलग 36 तास प्रोग्रामिंग करणे हे त्या स्पर्धेत मोठे आव्हान होते हे आव्हान यशस्वीरित्या एमजीएम च्या संघाने पुर्ण केले. या स्पर्धेत संपुर्ण देशभरातून जवळपास 11 हजार संघानी सहभाग नोंदविला होता. एमजीएम अभियांत्रिकीच्या संघानी प्रथम पारितोषीक प्राप्त केले असून मान्यवरांच्या हस्ते रोख 75 हजार व प्रमाणपत्र असे पारितोषीक देण्यात आले. अर्काना अभियांत्रिकीच्या संघामध्ये ओेंकार देशपांडे, प्रतिक्षा वलबे, धनश्री कुलकर्णी, शिवानी वैद्य, निखील ठाकरे व जयेश उकळकर यांचा सहभाग होता. मार्गदर्शक म्हणून प्रा.राहुलसिंग बिसेन व एमजीएम चे माजी विद्यार्थी व सध्या रेंटली सिस्टिम्स्, पुणे येथे कार्यरत असलेले संगमेश सोमावार यांचे संघाला मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल एमजीएम चे अध्यक्ष कमलकिशोर कदम, प्राचार्या डॉ.गीता लाठकर, प्रा.अर्चना राजूरकर व इतर सर्व विभाग प्रमुखांनी अभिनंदन केले आहे.