नांदेड:गाडी संख्या 12716 अमृतसर – हु. सा. नांदेड सचखंड एक्स्प्रेस आज 13 तास उशिरा धावत आहे. यामुळे उद्या दिनांक 7 मार्च 2019 रोजी नांदेड येथून निघणारी गाडी संख्या 12715 हु. सा. नांदेड ते अमृतसर सचखंड एक्स्प्रेस तिच्या नियमित वेळे ऐवजी दुपारी 12.45 वाजता नांदेड येथून सुटेल.प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.
जनसंपर्क कार्यालय, नांदेड