
नांदेड – काँग्रेसचे महानगराध्यक्ष तथा विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून या निमित्त सामाजिक बांधिलकी सांभाळत एक लक्ष रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ते उद्या दि.24 रोजी जिल्हाधिकार्यांकडे सपुर्द करणार आहेत. उद्या 24 रोजी दुपारी 1 वाजता माजी पालकमंत्री आ.डी.पी.सावंत, आ.वसंतराव चव्हाण, महापौर सौ.शिलाताई भवरे, जि.प.अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर, माजी आ.हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ.माधवराव पा.जवळगावकर, माजी आ.रावसाहेब अंतापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकार्यांना एक लक्ष रुपयांचा धनादेश सपुर्द करणार आहेत. आपल्या वाढदिवसानिमित्त सर्व काँग्रेस कार्यकर्ते व मित्र परिवाराने हार-तुरे किंवा कोणतेही सत्काराचे साहित्य आणू नये, केवळ आपल्या शाब्दिक शुभेच्छा व प्रत्यक्ष भेट आपणासाठी आनंददायी असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.