वसमत तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी फ़ेरोज पठाण यांची बिनविरोध निवड

वसमत (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सलग्न वसमत तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संपादक फ़ेरोज पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे

रविवारी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे वसमत तालुका पत्रकार संघाची बैठक संजय बर्दापुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालीबैठकीत विविध विषयावर चर्चा झाली तसेच मागील कार्यकारणी बर्खास्त करण्यात येऊन सर्वानुमते नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे

यात तालुका अध्यक्ष म्हणून गौरव महाराष्ट्राचा चे संपादक फ़ेरोज पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्ष म्हणून अशोक गुंडाळे,सचिव नासर पठाण, कार्याध्यक्ष महावीर आदमाने,सहसचिव नामदेव दळवी,कोषाध्यक्ष मोईन कादरी,शहर संघटक शेख इलियास,ग्रामीण संघटक प्रकाश इंगोले, प्रसिद्धीप्रमुख समीर अजमल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली

या वेळी जेष्ट पत्रकार शेख अफसर,गंगाधर भोसले, शेख इस्माईल,दिनेश पालीमकर,शेख खदिर, शमीम सिद्दिकी, संजय बेंडके, अनिल पंडित,संदीप वरवंटे, मोहसिन पठाण, प्रेस फोटोग्राफर नंदू परदेशी, श्रीधर वाळवंटे आदींची उपस्थिती होती

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading