लोकसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची नावे

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 182 उमेदवारांचा समावेश आहे.भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या गांधीनगर मतदारसंघातू भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक लालकृष्ण अडवाणी लढणार आहेत की नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही वाराणसीमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. नितीन गडकरी, राजनाथ सिंह यासारख्या भाजपाच्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

 

 

याचबरोबर, या यादीत महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची नावे आहे. यात अहमदनगर आणि लातूरच्या उमेदवारांमध्ये बदल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून उमेवारी देण्यात आली आहे. तर, लातूरमधून सुधाकर राव शिंगारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.
भाजपाचे महाराष्ट्रातील उमेदवार… 
नंदुरबार – हीना गावित
धुळे – सुभाष भामरे
रावेर- रक्षा खडसे
अकोला – संजय धोत्रे
वर्धा – रामदास तडस
नागपूर – नितीन गडकरी
गडचिरोली-चिमुरी – अशोक नेते
चंद्रपूर- हंसराज अहिर
जालना – रावसाहेब दानवे
भिवंडी – कपिल पाटील
मुंबई उत्तर – गोपाळ शेट्टी
मुंबई उत्तर मध्य – पूनम महाजन
अहमदनगर – सुजय विखे पाटील
बीड – डॉ. प्रीतम मुंडे
लातूर – सुधाकरराव शिंगारे
सांगली – संजयकाका पाटील

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading