मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर पुन्हा भरकटलं

कोल्हापूर |25 Oct. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना घडली आहे. दिशा न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोल्हापूर शहराभोवती चकरा मारत होतं. सांगलीचा दौरा आटोपून कोडोलीतील शेतकरी कष्टकरी मेळाव्याला जाताना हा प्रकार घडला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार होते. पृथ्वीराज देशमुख यांनी परिसराचा अंदाज घेत पायलटला दिशा सांगितली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर वारणा हेलिपॅडवर उतरलं. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसोबत अनुचित प्रकार घडण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. याआधी लातूर, अलिबाग, नाशिक, भाईंदरमध्ये असे प्रकार घडले आहेत.

news by .thodkiyaat.com

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading