माजी खासदार धोंडगे यांच्यावर ऍट्रासिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नांदेड – कंधार येथील माजी खासदार व आमदार भाई केशव धोंडगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयक जातीवाचक व अपमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सोनखेड, जवळा, बोरगांव येथील ग्रामस्थांनी त्यांच्यावर जातीय तेढ निर्माण करणे, आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावणे, भारतीय संविधानाचा अपमान करणे या प्रकरणी ऍट्रासिटी ऍक्टनुसार व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सोनखेड पोलिस स्टेशन ठाणे अंमलदाराकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दि. २३ ऑक्टोंबर रोजी कंधार येथील विधी महाविद्यालयात प्रा. डोम्पले यांना पीएचडी मिळाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात माजी आमदार व खासदार केशव शंकर धोंडगे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपमानकारक व जातीवादी शब्द उच्चारुन, जातीय तेढ निर्माण करुन सामाजिक ऐक्य व अखंडता बिघडवण्याचे तसेच अराजकता माजवण्याचे हीन काम केले आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावून द्वेष निर्माण झाला. या विधानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच भारतीय संविधानाचा घोर अपमान झालेला आहे. त्यांच्या या मनुवादी, सनातनी व गैर वक्तव्यामुळे आंबेडकरी समाजात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सोनखेड, जवळा, बोरगांव येथील ग्रामस्थांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काल दि. २५ ऑक्टोंबर रोजी सोनखेड पोलिस ठाण्यात केली. या तक्रारीवर पुरभाजी गोडबोले, मिलींद गोडबोले, तुकाराम खिल्लारे, राजाराम गोडबोले, राहुल खिल्लारे, जनार्दन गोडबोले, आनंद गोडबोले, पिंटू वड, सचिन गायकवाड, बबन गोडबोले, धनराज गोडबोले, चंद्रकांत गोडबोले, गोविंद कांबळे, किशन गोडबोले, धम्मपाल गोडबोले, अविनाश इंगोले, समाधान लोखंडे, अप्पाराव गच्चे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading