किनवट (प्रतिनिधी ) श्रीनगर स्थित पुलवामा येथे केंद्रीय राखीव दल गटावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ किनवट व परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन पाकिस्तान च्या निषेधार्थ आज स्वयंस्फूर्तीने व्यापारपेठ बंद ठेवून आपला निषेध व्यक्त केला,
पुलवामा येथील घटनेच्या निषेधार्थ देशात सगळीकडेच निषेध रॅली ,कॅन्डल मार्च ,बंद लोकांनी स्वयंस्फूर्तीने करत असून किनवट शहर व तालुक्यातही विविध ठिकाणी लोकांनी आपली व्यापारी संकुले स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलीत. दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून शिवाजी चौक पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन करण्यात आले होते . या कॅन्डल मार्च मध्ये किनवट शहर व परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने यामध्ये सहभागी झाले होते .शिवाजी चौक येथे सर्व कॅण्डल शहीद वीर जवानाच्या प्रतिमेसमोर ठेवून किनवट वासिया तर्फे वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दोन मिनिटे स्तब्ध राहून वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .यावेळी किनवट शहरातील सर्व नागरिक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच प्रमाणे आजही 16 फेब्रुवारी रोजी किनवट शहर व परिसरातील नागरिकांनी पुलवामा येथील घटनेच्या निषेधार्थ स्वयंस्फुर्ती ने आपले दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदविला. या बंद च्या दरम्यान सर्वीकडे शांतता पाळण्यात आली होती.