परभणी : समाजवादी पार्टीच्या पदाधिकायांची फेरनिवड

परभणी  : प्रतिनिधी :  येथील समाजवादी पार्टीच्या जिल्हा कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक प्रदेश सचिव मोहम्मद अल्ताफ मेमन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा व शहरातील पदाधिकाºयांच्या फेरनिवडी करण्यात आल्या. आगमी लोकसभा व विधानसभेच्या अनुषंगाने पार्टीच्या वतीने मोेर्चेबांधणी सुरु असून त्यासाठी पार्टीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे कार्य गतीमान करण्याच्या उद्देशाने प्रदेश सचिव मो.अल्ताफ मेमन यांच्या आदेशाने जिल्हा कार्यालयात बैठक घेवून सर्वच पदाधिकाºयांच्या फेरनिवडी करण्यात आल्या त्यात महानगरअध्यक्ष मन्सुर खान पठाण, जिल्हा महासचिव मोईन खान, जि.उपाध्यक्ष खाजा मुजमील, तस्लीम खतीब, सुधाकर पौळ, तर सेलू जिंतूर विधानसभा अध्यक्ष सय्यद दिलावर स.जमालसाब, विधानसभा अध्यक्ष गंगाखेड,पुर्णा शेख उस्मान आदींचा समावेश आहे.
औरंगाबाद येथे २३ फेबु्रवारी रोजी पार्टीचा मेळावा होणार आहे त्या दरम्यान उर्वरीत पदाधिकाºयांच्या निवडी व नियुक्तीपत्र देण्यात येईल  अशी माहीती प्रदेशसचिव मो.अल्ताफ यांनी दिली.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading