नांदेड़, 1 फेब्रुवारी .नांदेडच्या गुरुद्वारा दर्शनासाठी मुद्दामहुन सुरु करण्यात आलेल्या सचखंड एक्सप्रेस आणि श्री गंगानगर एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना नांदेड़ मध्ये प्लैटफॉर्म क्रमाँक एक वर जागा मिळावी या मागणीसाठी शुक्रवार ता. 1 फेब्रुवारी रोजी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड़ विभागाचे अतिरिक्त व्यवस्थापक विश्वनाथ एरा यांना निवेदन सादर करण्यात आले.मागील तीन चार महिन्या पासून पंजाबहुन येणारी सचखंड एक्सप्रेस आणि श्री गंगानगर एक्सप्रेस यांचे आगमन चार क्रमांकाच्या प्लैटफॉर्म वर होत आहे. गुरुद्वाराच्या दर्शनार्थ 36 ते 40 तासांचा प्रवास करून पोहोचलेल्या भाविकांना मात्र येथे पोहोचल्यानंतर आपले सामान (लगेज ) घेऊन तीन प्लैटफॉर्म ओलांडून स्टेशनच्या मुख्य गेटला यावे लगते. भाविकामध्ये लहान मूल, महिला आणि वृद्धांचा ही सहभाग असतो. या मुळे नांदेड़ला पोहचणाऱ्या भाविकांची तारंबळ उड़त आहे. वृद्धांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. फ्लेटफॉर्म क्रमांक चार च्या गेट येथून गुरुद्वारा साठी फिरून जावे लागत आहे तसेच स्टेडियम रोड, वी. आय. पी. मार्ग, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली गेट उड़ान पूल होऊन चिखलवाड़ी मार्गे गुरुद्वारा पोहचावे लागत आहे. या साठी ऑटो रिक्शा चालक भाविका कडून जास्त पैसे घेत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सचखंड आणि श्रीगंगानगर रेल्वे गाडियाना फ्लेटफॉर्म क्रमांक एक वर थाम्बा देण्याची मागणी प्रस्तुत निवेदनात करण्यात आली. या वेळी गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य गुरमीत सिंघ महाजन, राजेंद्र सिंघ पुजारी, मनप्रीत सिंघ कुँजीवाले, अधीक्षक गुरविंदर सिंघ वाधवा, रवींद्र सिंघ मोदी, जसपाल सिंघ लांगरी, रणजीत सिंघ गिल, बीरेंदर सिंघ बेदी, सतनाम सिंघ गिल, जरनेलसिंघ गाड़ीवाले, करणसिंघ खालसा, ठाकुर सिंघ बावरी परभणी, मान सिंघ, मनप्रीत सिंघ कारागीर, बलजीत सिंघ शाह, नरेंद्रसिंघ खालसा आदि उपस्थित होते.