नांदेड:अजमेर विभाग, उत्तर –पश्चिम रेल्वे मधील भिनवालीया-राणी स्थानका दरम्यान दुहेरीकरणाचे कार्य पूर्ण झाल्यामुळे गाडी संख्या 17623 / 17624 नांदेड-बिकानेर-श्रीगंगानगर-बिकानेर-नांदेड या साप्ताहिक रेल्वे च्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
नांदेड येथू दिनांक 03 जानेवारी 2018 ला सुटणाऱ्या गाडी संख्या 17623 नांदेड-बिकानेर-श्रीगंगानगरया गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. हि गाडी बडोदा-अहेमदाबाद-महेसाणा-पालनपुर –अबुरोड-मारवार-लुनी –जोधपुर-मेर्ता रोड जंक्शन या मार्गाने जाते परंतु दिनांक 03 जानेवारी ला नांदेड येथून सुटणारी गाडी बदलेल्या मार्गाने म्हणजेच बडोदा-रतलाम-चंदेरीया-अजमेर-फलौनी-मेर्ता रोड बायपास – नागौर अशी धावेल.
तसेच दिनांक 29 डिसेंबर 2018 आणि दिनांक 5 जानेवारी 2019 ला श्री गंगानगर येथून सुटणारी गाडी संख्या 17624 श्रीगंगानगर-बिकानेर-नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस बदलेल्या मार्गाने म्हणजेच मेर्ता रोड जंक्शन – लुनी — मारवार– अबुरोड- पालनपुर –महेसाणा- – अहेमदाबाद –बडोदा अशी धावेल. प्रवाशांना होणाऱ्या असुविधे बद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे