नांदेडमध्ये शाळकरी मुलीची नदीत उडी मारुन आत्महत्या

नांदेड – शहरातील गोवर्धनघाट पुलावरुन शालेय विद्यार्थिनीने गोदावरी नदी पात्रात उडी घेतल्याची घटना दुपारी घडली. घटनेची माहिती कळताच जिवरक्षक दलाच्या सद्स्यांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, उशीरापर्यंत विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला नाही.या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांसह जिवरक्षक दलाच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जिवरक्षक दलाच्या सदस्यांना विद्यार्थीनीचे दप्तर आढळून आले. दप्तरात सापडलेल्या ओळखपत्रावरुन सदरील विद्यार्थीनी गोकुळ नगर येथील पीपल्स हायस्कुलची विद्यार्थीनी आहे ही माहिती मिळाली. ती इयत्ता ८ वीमध्ये शिकत होती. या विद्यार्थीनीचे नाव लक्ष्मी धनराज किर्ती (वय १४) असून ती गंगाचाळ येथील राहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सदरील विद्यार्थीनीचा मृतदेह सापडला नसून जिवरक्षक दलाची शोध मोहिम सुरू आहे.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading