नांदेडमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कॉंग्रेस- सेना आमदार भिडले 

नांदेड: जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. याबाबत काँग्रेस आमदार व समिती सदस्य विचारणा करण्यासाठी पालकमंत्री रामदास कदमयांच्याकडे गेले असता, बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतरनंतर धक्काबुकीत झाले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वाटपावरून कॉंग्रेस -सेना सदस्य आमने सामने. बैठकीनंतर हा वाद आणखी वाढला आणि सेना – काँग्रेसच्या आमदारांमध्ये धक्का बुक्की झाली. पालकमंत्री रामदास कदम यांच्या समोर काँग्रेस आमदार अमरनाथ राजूरकर आणि सेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्यात धक्का बुक्की झाली.काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर व पालकमंत्री कदम यांच्यात प्रारंभी शाब्दिक वादावादी झाली, त्यानंतर काँग्रेस व शिवसेना आमदार तसेच कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. यावेळी दोन्ही बाजूनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वादविवादानंतर रामदास कदम व आ. राजूकर याची बंद खोलीमध्ये चर्चा झाल्यानंतर सर्व जण निघून गेले. पालकमंत्री नियोजन समिती सदस्यांच्या हक्कावर गदा आणत असल्याचा आरोप यावेळी कॉंग्रेसने केला.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading