नांदेड:पत्रकारांचे 26 नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन

नांदेड/प्रतिनिधी-पत्रकार संरक्षण कायदा व पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या वतीने संपुर्ण राज्यात धरणे आंदोलन होत आहे. परिषदेच्या आवाहनानुसार नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोमवार दि.26 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन योजना, छोट्या वृत्तपत्रांचे अस्तित्व संपुष्ठात आणणारे धोरण मागे घ्यावे, अधिस्वीकृतीच्या जाचक अटी शिथील कराव्यात, मजिंठीया आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आदी मागण्यांसाठी परिषदेच्या आवाहनानुसार नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने सोमवार दि.26 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्व पत्रकार, संघटनांनी व त्यांच्या पदाधिकार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रदिप नागापुरकर, कार्याध्यक्ष गोर्वधन बियाणी, सरचिटणीस सुभाष लोणे, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश कांबळे, राम शेवडीकर, विभागीय सचिव विजय जोशी, माजी सरचिटणीस मराठी पत्रकार परिषद मुंबई चारूदत्त चौधरी, कोषाध्यक्ष राजेश शिंदे, महानगराध्यक्ष विश्वनाथ देशमुख, उपाध्यक्ष अविनाश पाटील, किरण कुळकर्णी, सरचिटणीस अभय कुळकजाईकर, धोडोपंत विष्णुपूरीकर, लक्ष्मण भवरे आदींनी केले आहे.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading