अर्धापूर : ( शेख जुबेर ) ट्रकमध्ये कोंबून निर्दयपणे गोवंश घेऊन जाणारा ट्रक अर्धापूर पोलिसांनी नांदेड-नागपूर महामार्ग वरील (सत्यगणपती दाभड)जवळ रस्त्यावर ४ वाजेच्या सुमारास पकडला.ट्रकमध्ये अंदाजे ३० ते ३५ च्यावर गोवंश (गाई व गोरे) ही जनावरे होती.चालक सापडला तर त्याचे इतर साथीदार मात्र ट्रक सोडून फरार झाले. 

अर्धापूर येथील महामार्ग रस्त्यावर ट्रकमध्ये कोंबून निर्दयपणे जनावरे घेऊन जाणारा ट्रक अर्धापूर पोलिसांनी सत्यगणपती दाभड जवळ गुरूवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पकडला. ट्रकमध्ये अंदाजे ३० ते ३५ च्यावर जनावरे होती.चालक सापडला व त्याचे इतर साथीदार ट्रक सोडून फरार झाले आहेत.
या विषयी अधिक वृत्त असे कि नांदेड-नागपूर महामार्ग येथून अवैध रित्या गुरे घेऊन जाणारा ट्रक अर्धापूर पोलिसांनी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पकडला.अर्धापूर पोलीस स्टेशन चे कर्मचारी चतुर्थी निमीत्त सत्यगणपती दाभड येथे बंदोबस्तात असतांना अर्धापूर पोलीस यांना माहिती मिळताच पोलीस स्टेशन चे पांडे,कदम,वैद्य यांनी ट्रक नंबर (एम.पी.०९ एच.जि.१९८५) दहा टायरचा संशय रित्या जाणार ट्रक थांबवला पोलिसांनी चौकशी केली असता, ट्रकमध्ये निर्दयीपणे गुरे कोंबल्याचे निदर्शनास आले.
ट्रक मधुन खुप दुर्गंधी येत होती ट्रकमध्ये गुदमरून काही जनावरांचा मृत्यूही झाला.यामध्ये मृत अवस्थेत ७ जनावरे अढळली असुन त्यापैकी (गाय व गोरे) एव्हढी गोवंश आहेत. जनावरांची अवैध वाहतुक करणारा ट्रक अर्धापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आला.यावेळी वाहन चालक सापडला व इतर साथीदार फरार झाले.
यावेळी मोठ्या संख्येने नागरिक पोलीस ठाणे परिसरात जमले होते.मृत जनावरांना जे.सी.बी.च्या साह्याने नागरिकांच्या मदतीने जनावरांना ट्रकबाहेर काढण्यात आले. जनावरांना चारापाणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले यावेळी अर्धापूर पशुवैधकीय दवाखान्याचे डाॅ. व कर्मचारी यांनी जखमी जनावरांवर उपचार केला.पोलीसांच्या माहीती नुसार अवैध जनावरांची वाहतुक करणारा ट्रक मध्य प्रदेश येथुन हॅद्राबाद मार्गे ट्रक जात असावा त्यापैकी दुसरा ट्रक नायेगाव येथे पकडल्याचा अंदाज आहे.असी माहीती यावेळी मिळाली.
सदर ट्रक अर्धापूर शहर ठाण्यात उभा करण्यात आला आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.यावेळी अर्धापूर पोलीस ठाण्याचे पो.नि.विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढिल तपास हे पाहत आहेत