नांदेड:1. गाडी संख्या 16733 रामेश्वरम-ओखा एक्स्प्रेस दिनांक 14 डिसेंबर पासून रामेश्वरम ते मंडपम रेल्वे स्थानका दरम्यान पुढील आदेश येई पर्यंत तात्पुरती रद्द करण्यात आली आहे..तसेच गाडी संख्या 16734 ओखा-रामेश्वरम ट्रेन दिनांक 18 डिसेंबर पासून मंडपम ते रामेश्वरम दरम्यान पुढील आदेश येई पर्यंत तात्पुरती रद्द करण्यात आली आहे.प्रवाश्यांना होणाऱ्या असुवीधे बाबत रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.
2. नाताळ / नाव वर्षा निमित्त शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांच्या सोयी करिता दक्षिण मध्य रेल्वे एक विशेष रेल्वे धावणार आहे टी पुढील प्रमाणे ==
गाडी संख्या 07713 – 07714 विजयवाडा –नगरसोल-विजयवाडा विशेष गाडी धावणार आहे. हि गाडी दिनांक 24 डिसेंबर रोजी विजयवाडा येथून सकाळी 09.40 वाजता सुटेल आणि सिकंदराबाद-14.00, नांदेड-21.50 , औरंगाबाद=03.20 वाजता निघून नगरसोल येथे 05.50 वाजता पोहोचेल.परतीच्या प्रवासात हि गाडी नगरसोल रेल्वे स्थानकावरून दिनांक 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 17.30 वाजता सुटेल आणि औरंगाबाद-19.15 , परभणी -23.17, नांदेड -00.50 ,सिकंदराबाद – 07.55 वाजता सुटून विजयवाडा येथे दुपारी 13.40 वाजत पोहोचेल