धर्माबाद बाजार समिती सभापतीपदासाठी रस्सीखेच, काँग्रेंस व भाजप एकत्र येण्याची चिन्हे

बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस चे ८, काँग्रेसचे ४, भाजपचे २, शिवसेना १ आणि व्यापारी, हमाल, मापाडी असे ३ अपक्ष  असे पक्षीय बलाबल आहे. यात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या पारड्यात सर्वाधिक जागा असल्या तरीही बहुमतासाठी अजून २ सदस्यांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीच्या   दत्ताहारी पाटील चोळाखेकर यांच्या पत्नी गोदावरीबाई दत्तात्रय कदम व माजी उपसभापती रामचंद्र पाटील बन्नाळीकर या दोघांची नावे सभापतीपदासाठी चर्चेत आहेत. या दोघांत जोरदार रस्सीखेच चालू असून या दोघांच्या भांडणाचा फायदा  तिसरल्याच होण्याची चर्चा आ
Leave a comment