रायनपाडू रेल्वे स्थानकावरील पावसामुळे काही रेल्वे गाड्यांच्या परीचालनावर परिणाम झाला आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आल्या आहेत ते पुढील प्रमाणे —
रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
01. दिनांक 02 सप्टेंबर 2024 रोजी छत्रपती महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणारी गाडी संख्या 17057 मुंबई- सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
02. दिनांक 02 सप्टेंबर 2024 रोजी हजूर साहिब नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या 20810 नांदेड – संबलपुर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
03. दिनांक 02 सप्टेंबर 2024 रोजी तिरुपती येथून सुटणारी गाडी संख्या 17405 तिरुपती-आदिलाबाद कृष्णा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
04. दिनांक 03 सप्टेंबर 2024 रोजी आदिलाबाद येथून सुटणारी गाडी संख्या 17406 आदिलाबाद-तिरुपती कृष्णा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
05.दिनांक 02 सप्टेंबर 2024 रोजी काकिनाडा येथून सुटणारी गाडी संख्या 17206 काकिनाडा-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
06. दिनांक 03 सप्टेंबर 2024 रोजी साईनगर शिर्डी येथून सुटणारी गाडी संख्या 17205 साईनगर शिर्डी – काकिनाडा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे