दिवाळीचा बोनस म्हणून 600 कर्मचाऱ्यांना मोफत कार वाटल्या

सुरत | 25 oct:हिरे व्यापारी सावजी ढोलकिया दिवाळीच्या तोंडावर पुन्हा एकदा चर्चेत आहे. आपल्या 600 कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस म्हणून त्यांनी चक्क कार गिफ्ट केल्या आहेत. सावजी ढोलकिया यांची हरे कृष्ण डायमंड एक्सपोर्ट कंपनी आहे. ते दरवर्षी दिवाळीत आपल्या कर्मचाऱ्यांना बंपर बोनस देत असतात. सावजी ढोलकिया यांनी यापूर्वी आपल्या कंपनीतील 1260 जणांना कार गिफ्ट केल्या आहेत. तर 400 जणांना घर खरेदी करण्यास मदत केली आहे. ढोलकिया यांच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 6 हजार कोटी रुपये आहे. त्यांच्या या अनोख्या दिवाळी बोनसची आता देशभरात चांगलीच चर्चा आहे.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading