तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकेल :देवेंद्र फडणवीस

मुंबई | आगामी निवडणुकीत मतांचं विभाजन होऊ न देता, भाजप-शिवसेना जर एकत्र लढले तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेशी युती करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते TV9 मराठीच्या ‘महाराष्ट्र मंथन’ या कार्यक्रमात बोलत होते.

राजकारणात आम्ही वेगवेगळे जरी असलो तरी आम्ही भाऊ-भाऊ आहोत. मोठा कोण आणि छोटा कोण? हे माध्यमांनी ठरवावे, असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, आगामी निवडणुकीत आम्ही एकत्र लढणार असून युतीसाठी आम्ही स्वत: पुढाकार घेऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading