टिपू सुलतान ब्रिगेड उमरीची कार्यकारिणी घोषित

आज उमरी येथे टिपू सुलतान ब्रिगेडची बैठक संस्थापक अध्यक्ष मा. शेख सुभान अली सर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष डॉ. ज़हीर पठान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत तालुका आणि शहरची नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी फयाज पठान यांची, शहर अध्यक्षपदी अज़हर बेग यांची निवड करण्यात आली.

विद्यार्थी ब्रिगेड तालुका अध्यक्ष म्हणून शेख जमाल यांची, युवा ब्रिगेड तालुका अध्यक्ष म्हणून सोहल बेग यांची निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणी अशी- शेख इमरान, शादमान बेग (तालुका उपाध्यक्ष), शेख नदीम (तालुका सचिव), फेरोज़ पटेल (प्रसिद्धी प्रमुख), शेख साजिद (शहर उपाध्यक्ष),शेख गौस (शहर सचिव).

जिल्हाध्यक्ष डॉ. ज़हीर पठान यांनी सर्व पदाधिकारी यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मार्गदर्शन करताना सांगीतले की ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी महापुरुषांची शिकवण आत्मसात करावी,शांतता आणि सहकार्याची भावना जोपासावी तसेच देश सेवा आणि मानव सेवेसाठी सदैव तत्पर रहावे.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading