ईडीच्या चौकशीतच काय सात जन्म मी त्यांच्या सोबत असेन – शर्मिला ठाकरे

भाजप सूडबुद्धीचं राजकारण करत असल्याचा आरोप शर्मिला ठाकरे यांनी केला आहे. माझा नवरा घाबरणारा नाही.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान सहकुटूंब ईडीच्या चौकशीसाठी घराबाहेर पडलेत. सहकुटूंब जाताना पाहून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लगोलग ट्विट करून राज ठाकरे यांच्या कुटूंबियांवर निशाणा साधला. आणि चौकशीसाठी जाताय की सत्यनारायणाला अशा शब्दात दमानिया यांनी राज यांच्या कुटूंबियांवर टीका केली. या टीकेला उत्तर देताना मी राज ठाकरे यांची पत्नी आहे. ईडीच्या चौकशीतच काय पण सात जन्म राजसाहेबांसोबतच असेल अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिली आहे. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या.
राज ठाकरे यांची मागच्या तीन तासांपासून चौकशी सुरू आहे तर, त्यांचे कुटुंबिय ग्रँट हॉटेल येथे थांबले आहे.

राज यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि मुलगी उर्वशी ठाकरे ईडी च्य़ा कार्यलयाकडे एकत्र रवाना झाले होते. हे सर्व कुटूंबिय आता होटेलमध्ये राज यांची प्रतिक्षा करत आहेत.

दरम्यान, भाजप सूडबुद्धीचं राजकारण करत असल्याचा आरोप शर्मिला ठाकरे यांनी केला आहे. तसंच माझा नवरा घाबरणारा नाही, असेही त्या म्हणाल्या.

The post ईडीच्या चौकशीतच काय सात जन्म मी त्यांच्या सोबत असेन – शर्मिला ठाकरे appeared first on Maharashtra Today.

Source

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading