अर्धापूर (शेख जुबेर ) शहरातील व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारा मार्फत पंतप्रधान गरीब कुटुंब योजना,आत्मनिर्भर भारत,ए.पी.एल.केशरी योजने अंतर्गत वाटप केलेल्या धान्याची चौकशी करून कार्यवाही करा.या मागणीचे निवेदन शेख साबेर यांनी तहसीलदार, अर्धापूर यांना दिले आहे.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य शासनाने महाराष्ट्रात लाँकडाऊन व संचारबंदी लागू केली होती.त्या काळात गरीब कुटुंबातील व्यक्तींना पंतप्रधान गरीब कुटुंब योजना,आत्मनिर्भर भारत या योजने अंतर्गत स्वस्त धान्य दुकानदारा मार्फत सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून दिले होते.
गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य न देता.ते धान्य काळ्या बाजारात विकण्यात आले.
अर्धापूर तालुक्यात व शहरात लाँकडाऊन व संचारबंदी काळात वाटप करण्यात आलेल्या धान्याची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे शेख साबेर यांनी केली आहे.
