अर्धापूर ता 11 (बातमीदार ): राज्यस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यात काॅग्रेला मिळालेल्या यशाचा जल्लोष काॅग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानक परिसरातील काॅग्रेसच्या कार्यालयासमोर फाटाक्यांची अतिषबाजी व पेढे वाटून करण्यात आला. पाच राज्यातील निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध जनादेश मिळाल्याचा आनंद काॅग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व फटाके फोटून जल्लोष केला.यावेळी युवक काॅग्रेसचे नांदेड जिल्हा आध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर, नासेर खान पठान, पप्पु बेग, मारोतराव कानोडे, राजु शेटे, प्रवीण देशमुख, मुसबीर खतीब, गाजी काजी, पंडित लंगडे, सोनाजी सरोदे, व्यंकटी साखरे, नवनाथ बारसे, मुख्तेदर खान पठान, शेख लायक, व्यंकटी साखरे, गोविंद सिनगारे, शेख मकसुद, बबन लोखंडे, राजु कल्याणकर, महंमद सुलतान, व्यकंटी राऊत, उध्दव सरोदे, शेरू पठान, अबुझार बेग,गौस मुल्ला आदी उपस्थित होते.